Maha ID 2026: महासारथी पोर्टलवर Maha ID कसा काढायचा? संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया इथे बघा
MahaID 2026 या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र सरकारने नुकतेच सांगितल्याप्रमाणे आता आपण इथून पुढे सरकारी योजनांचा कोणतापण लाभ घ्यायचा असेल तर MahaID लागणार आहे. आणि आपण हा MahaID आपण ऑनलाइन कसा काढू शकतो हेच या पोस्ट मध्ये बघणार आहोत, तर आपण दर वेळी सरकारी योजनेचा अर्ज भरायला सेतू मध्ये गेलो की तेच नेहमीचे आधार कार्ड द्या , रेशन कार्ड द्या , उत्पन्नाचा दाखला द्या, जातीचा दाखला द्या. एका कामासाठी तयार केलेली कागदपत्रं दुसऱ्या कामाकरिता परत तयार करायची. प्रत्येक वेळी तोच फॉर्म, तीच धावपळ. “एकदाच सगळी माहिती कुठेतरी साठवली जावी आणि सर्व कागजपत्रांचा एक आयडी नंबर असावा असे नेहमी वाटायचे पण आता आपली हीच इच्छा सरकारने पूर्ण केली आहे. 24 जून सरकारने महासारथी (MahaSarathi) हे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आणि MahaID ही प्रत्येक नागरिकाची एकमेव डिजिटल ओळख अधिकृतपणे सुरू केली. हा एकच क्रमांक तुमच्या आधार कार्डशी जोडलेला असेल आणि यातच तुमची सगळी माहिती सुरक्षितपणे साठवली जाईल. पण MahaID नक्की काय आहे, तो कोणाला लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं MahaID कसा काढायचा हे नीट समजून घेणं गरजेचं आहे.
MahaID म्हणजे काय?
MahaID ही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी तयार केलेली एकमेव डिजिटल ओळख (Unique Digital Identity) आहे. हा एक क्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक असतो आणि यामध्ये तुमचं वय, उत्पन्न, जात, पत्ता, शिक्षण अशी सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी सुरक्षितपणे साठवलेली असते. सोप्या भाषेत सांगायचं तर जसं तुमचं आधार कार्ड ही तुमची ओळख आहे, तसंच MahaID ही महाराष्ट्र शासनाच्या सेवा व योजनांसाठीची तुमची एकमेव ओळख आहे. एकदा MahaID तयार झाला की वेगवेगळ्या कामाकरिता व योजनांसाठी पुन्हा पुन्हा तीच माहिती आणि कागदपत्रं द्यायची गरज राहात नाही. याच MahaID वरून काम होते.
MahaID महासारथी पोर्टल म्हणजे काय?
महासारथी (MahaSarathi) हे महाराष्ट्र शासनाचं एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाशी संबंधित महत्त्वाची माहिती हे पोर्टल सुरक्षितपणे एकत्र करतं आणि त्यावरूनच तुमचा MahaID तयार होतो.राज्याच्या वेगवेगळ्या सेवा आता हळूहळू एकाच platform वर म्हणजेच महासारथी आणि नवीन MahaDBT 2.0 पोर्टलवर आणल्या जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या नवीन योजनांचा अर्ज करताना MahaID ही पायरी महत्त्वाची ठरणार आहे.
अधिकृत वेबसाइट: mahasarathi.maharashtra.gov.in
MahaID 2026: MahaID चे फायदे काय?
एकदा MahaID तयार झाला की वेगवेगळ्या विभागांसाठी वारंवार अर्ज भरण्याची किंवा तीच कागदपत्रं पुन्हा पुन्हा सादर करण्याची गरज राहात नाही. तुमची माहिती आपोआप भरली जाते. MahaID / महासारथी आता DigiLocker शीही जोडला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रवासी आपली ही ओळख कुठेही, कधीही डिजिटल स्वरूपात access आणि share करू शकतात.
MahaID 2026: MahaID काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
MahaID 2026 काढण्याची प्रक्रिया मुख्यतः आधारवर आधारित (Aadhaar-based) असल्यामुळे फार कागदपत्रांची गरज नसते. साधारणपणे लागणाऱ्या गोष्टी:
- आधार कार्ड (Aadhaar number)
- आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर (OTP साठी आवश्यक)
- स्वतःचा ईमेल आयडी (काही ठिकाणी verification साठी)
- आधार-लिंक केलेलं बँक खातं (DBT लाभांसाठी उपयुक्त)
MahaID कसा काढायचा? (संपूर्ण अर्ज प्रक्रिया)
पायरी 1: सर्वात आधी अधिकृत वेबसाइट mahasarathi.maharashtra.gov.in किंवा
mahadbt2.maharashtra.gov.in वर जा.
पायरी 2: उजव्या वरच्या कोपऱ्यातून आपली भाषा निवडा मराठी किंवा English.
पायरी 3: नविन असाल तर “Register” या बटणावर क्लिक करा
पायरी 4: आता आपला आधार नंबर टाका आणि OTP हा पर्याय निवडून “Send OTP” वर क्लिक करा.
पायरी 5: आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि verify करा.
पायरी 6: OTP verify झाल्यावर तुमची आधारमधील माहिती (नाव, पत्ता वगैरे) स्क्रीनवर दिसेल. ती तपासून घ्या.
पायरी 7: आता स्वतःचं username आणि password तयार करा आणि “Save” वर क्लिक करा. इथेच तुमचा MahaID तयार होतो.
MahaID 2026: महत्त्वाच्या लिंक्स
https://mahasarathi.maharashtra.gov.in/home/landing